शनिवार, ३० एप्रिल, २०१६
श्री गुरूदेव नमः
सर्वानाच जाण आहे संत म्हणजे ज्याने आपल्या जीवनातील नश्वर गोष्टींचा त्याग करून सत्वगुणाच्याही अवस्थेच्या पलीकडे जाऊन जो ब्रम्हरुपाशी तदाकार झाला व दया क्षमा शांति हे प्रत्यक्षात उतरवून समाजाच्या हितासाठी झटून त्यांना आपल्या प्रमाणेच करतात अशांना तुकोबाराया अदिकरून संतमहात्म्ये त्यांना संत म्हणतात..
पर्क्षिती राजाला जेव्हा शापाने ग्रासले असतांना त्यांना महान असे शुकदेवाच्या उपदेशावरुन सात दिवसांत शुकाचार्यांनी त्यांना भगवंताच्या लीलांचे वर्णन सांगुन त्यांना मोक्षप्राप्ती करवून तर दिलीच परंतु गुह्यतम ज्ञान सुद्धा सांगितले असे संत उदार असतात आपली पवित्र अशी भारतभूमि या भूमीत अनेक इश्वरीय अवतार तसेच इश्वरीय अंशावतार, संत महात्म्ये जन्मास आले त्यातल्या त्यात महाराष्ट्र राज्यात अनेक थोर संत महात्म्ये जन्मास येऊन त्यांच्या चरणकमलांनी ही भूमी पवित्र झाली आहे. असे संत म्हणजेच ज्ञानेश्वरा पासून तुकारामादि संता पर्यंत होऊन गेलेले व आताही थोर संत महात्म्ये या भूमीत आहे..संत कळण्या करिता एक मीटर असते ते कळणे फार कठीण असते संत हे आपल्यातच, सामान्य माणसासारखेच असतात. चालता बोलताच ते सहज बोलून मोलाचे मार्गदर्शन ते करीत असतात परंतु आपल्यावर असलेल्या अनेक जन्माच्या पापामुळे ते आपल्या लक्षात येत नाही त्यांचा जन्म हा विशिष्ट कारणांसाठी असतो. त्यांचे इष्ट कार्य संपले की ते त्यांचा अवतार संपवित असतात कारण, जन्मास येणे व ब्रम्हस्वरुपात लिन होणे हे त्यांच्याच हातात असते. संतांना अतिशय कष्टातून हलाखीचे जीवन जगावे लागत असते यातुन जो विजयी होतो तेव्हाच इश्वर त्यांचे स्वरूप त्यांना देतो. आपल्याच परिसरातील सर्वांच्या परिचयाचे आपण संत जाणताच ते म्हणजे संत सद्गुरू श्री श्रीराम महाराज कुलकर्णी जांभरुणकर बाबांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाल्यास तो असा बाबा तसे हिंगोली जिल्हय़ातील इंचा गावचे,तिथे त्यांची स्थावर मालमत्ता भरपूर होती. बाबांच्या डोक्यावरील आईवडीलांचे छत्र बालपणीच हरविले, त्यावेळी बाबांचे एवढे कष्ट झाले की ते शब्दात वर्णन करणे कठीणच. बाबांना तशी बालपणा पासूनच देवाची खुप ओढ होती बाबांना दुसरे काहीही आवडत नसे पुढे चालून. बाबांना वैराग्य उत्पन्न झाले. घरादाराचा संसाराचा त्यांनी त्याग केला व फिरत फिरत नर्सी येथील माळावरच्या हनुमंता जवळ आले व बसले तिथे उतरप्रदेश मधील आग्रा (ताजमहाल) येथील संत रामप्रसाद आगरेकर महाराज यांचे हनुमंताजवळ घोर तपश्चर्या चालू होती. बाबा त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले व रामप्रसाद महाराज (काशीकिपडी)यांनी मागे वळून पाहिले तर बाबा उभे असलेले त्यांना दिसले महाराज त्यांच्यावर खूप रागावले कारण त्यांचा स्वभाव फार कडक होता परंतु नंतर ध्यान करून बघीतल्यानंतर बाबा त्यांना सामान्य माणूस न वाटता त्यांचा अधिकार कापडी महाराजांच्या लक्षात आला व त्यांना नंतर प्रेमाने बोलू लागले. बाबांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली व महाराजांना फार मोठा प्रश्न पडला कारण त्यांच्या जीवनात गुरू दुसरे होते,आपण त्यांना कसा काय अनुग्रह द्यावा ह्या विचारात ते पडले. परंतु बाबांच्या आग्रहामुळे त्यांनी त्यांना अनुग्रह न देता फक्त भक्ति कशी करायची ते सांगितले ती भक्ती म्हणजे दररोज दक्षिणमुखी अकरा हनुमंत रायाची पुजा पायी जाऊन करायची व श्रीराम जय राम जय जय राम या तेरा अक्षरी मंत्राचा अकरा कोटी जप करायला सांगितले बाबांनी ती आज्ञा पालन करून त्यांनी खरोखरच त्यांच्या सांगण्या प्रमाणे, त्यांनी कठोर भक्ती केली सारखी नेमाने 38 वर्षे भक्ति केली व जांभरुण (बु)येथील हनुमंताचा साक्षात्कार झाला व त्यांनी या गावात राहून माझीच भक्ति कर दुसरे काही करण्याची गरज नाही, असे सांगितल्यानंतर बाबा मंदिरातच राहून त्यांची भक्ती चालू होती. पुजा,झाडझुड गावात तेल मागून दिवा चालू ठेवणे अशा प्रकारे त्यांची दिनचर्या चालू होती बाबा जांभरुणच्या हनुमंताची भक्ति जरी करीत असले तरी काही गावातील त्याकाळच्या भाविक लोकांनी निधानराव ची शिल्लक असलेली जागा (गोठा )तिची दुरूस्ती करून राहायला दिली नंतर त्यांच्या बायको मुला विषयी चौकशी केली असताना ते सांगत नसत परंतु त्यांचा शोध लावून त्यांनी ज्यावेळी बाबा अतिशय आजारी पडले तेव्हा घेऊन आले. त्यावेळी बाबांनी सांगितले की माझी सासुरवाडी नर्सी आहे म्हणून मग त्यांच्या पत्नीस आणले व तिथून पुढे बाबांचा प्रपंच सुरू झाला. हा काळ होता इ.स. 1946 ते 1976 पर्यंत बाबांचा प्रपंचातील व्यवहारात त्यांनी अजिबात लक्ष घातले नाही. नंतर शेवटच्या 30 ते 40 वर्षांत बाबा लौकीकांमध्ये जास्त आले व त्यांना भगवंतानी एवढे मोठे केले की आज त्यांच्या तपश्चर्येच्या फलस्वरूपावर एवढी मोठी वास्तू मंदिर बाबांच्या भक्तांच्या शिष्यांच्या सहकार्यातून उभी राहीली आहे खरे तर बाबांचा या गोष्टीस विरोध होता परंतु आपल्यालाच कुठेतरी बाबांचे अस्तित्व असावे म्हणून हा फार मोठा प्रकल्प भक्त व शिष्य मंडळींच्या आग्रहास्तव उभा केलेला आहे या सर्वात मोलाचे योगदान म्हणजे त्यागी, निस्वार्थी, अतिशय प्रामाणिक व महाराजांच्या सर्व कुटुंबाच्या विचाराने चालणारे व चारही भावांना सारखे समजणारे त्यांच्याच विचार विनिमयाने खरोखर ह्या कामात अत्यंत कळकळ असणारे ते म्हणजे बद्री भाऊ सारडा मकोडीवाले ह.मु. सेनगाव ह्यांनी व बाबांचे दोन नंबरचे चिरंजीव किसन महाराज यांनी पुढाकार घेऊन हा फार मोठा प्रकल्प ध्यानीमनी नसतांना उभा केला. परंतु त्यांना असे मनात सुद्धा वाटले नव्हते की, एवढे काम होइल म्हणुन! खरोखरच बाबांच्या भक्तगणांनी व शिष्यगणांनी बाबांची सेवा या संस्थानच्या बांधकामास मदत देऊन त्यांनी केली हे फार मोठे पुण्याचे काम त्यांनी केले. खरोखर धन्यवादास पात्र होत संस्थानची वर्गणी सुरुवातीस विश्वनाथ महाराजांच्या मार्गदर्शनानुसार बाबांनी सांगीतल्या प्रमाणे सुरू केली होती त्यावेळी पहिली वर्गणी जोडतळा व हिरडी येथून जगन्नाथ महाराज, पुंजाजी महात्मा, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, कुंडलिकराव चेरमण,मदन माऊली, सारंग गाडे, तानाजी साहेब सुर्यभानजी चेरमन असे बाबांचे थोर भक्त यांनी पुढाकार घेऊन सुरूवात केली होती. खरोखरच बाबांची सेवा करणारे भक्त धन्य होत. बाबांचे तसे भक्तगण पूर्ण मराठवाडय़ात,विदर्भात आहेत. असे असले तरी बाबांचा काही गावावर व शिष्यावर व असंख्य भक्तावर प्रेम होते त्यापैकी, पूर्ण जीवन बाबांनी रिधोरा,वाघजाळी,पहेणी,सेनगाव, वरूड देवी, वरूड साई, भानखेडा,तळणी, वैजापूर, पुसेगाव, आठरवाडी,पार्डी, सुलदली, देवूळगाव,इडोळी,कडती,नांदुरा, जवळ, पळशी,शिवणी,कारेगाव, शिनगी,खुडज,ह्यावर अतिशय प्रेम होते हा काळ होता इ.स. 1952 ते 1982 पर्यंतचा त्यानंतर बाबांचे जास्त प्रिय असलेले बासंबा,जोडतळा,काळकोंडी ,आमला, घोटा, जांभरुण, सवड, वरूड गवळी, केसापुर,पिंपळखुटा, खानापूर, कलगाव,इत्यादी बरीच गावे आवडती होती. पुढे जसेजसे बाबांचे वय होत गेले तस तसे बाबांनी विश्वनाथ महाराज यांना त्यांच्या जवळील ज्ञान देत गेले....क्रमश......
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा